आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा ब्रिटिश राजसिंहासनाच्या वारसदाराची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश शाही कुटुंबाची प्रासंगिकता आणि त्यावर खर्च होणार्‍या करदात्यांच्या पैशांच्या वापरावर नेहमी प्रश्न उपस्थित होतात. असे असताना राजकुमार विल्यम आणि राणी केटच्या पहिल्या अपत्यावरून लोकांमध्ये उत्सुकता आहे. केटच्या नावे असलेल्या पश्चिम लंडनस्थित डचेस ऑफ केम्ब्रिज बारमध्ये मद्याचा प्याला रिचवताना 26 वर्षीय शिक्षक केरोन डावे म्हणतात, मी शाही लग्न पाहण्यासाठी कॉलेजला दांडी मारली होती. आता मी नव्या पाहुण्याची वाट पाहत आहे. मित्र त्याच्या उत्साहावर हसतात, मात्र मान्य करतात की, त्यांचीदेखील या घटनेवर नजर आहे.

ब्रिटनमध्ये शाही कुटुंबाची तरुण पिढी लोकप्रिय आहे. 2012 च्या एका सर्वेक्षणात 31 वर्षीय विल्यमला ब्रिटनसाठी सर्वोत्कृष्ट शाही दूत म्हणून मान्यता दिली गेली. त्यानंतर त्यांचे लहान बंधू 28 वर्षीय राजकुमार हॅरी आणि 31 वर्षीय केटचा क्रमांक होता. 20-30 वर्षे वयाचे युवक विंडसरच्या बुजुर्ग राजघराण्याशी स्वत:ला जोडू शकत नव्हते. ते या युवा त्रिकोणात स्वत:चे प्रतिबिंब पाहतात. केटच्या गरोदर अवस्थेने या भावनेला खतपाणी दिले आहे. विल्यम-केट येणार्‍या बाळाच्या संबंधात जो काही निर्णय घेतील, तो राजघराण्याच्या ब्रँडला नव्या रूपात दाखवण्याच्या धोरणाची झलक दाखवेल.

ब्रिटिश कन्सल्टन्सी फॉर रिटेल रिसर्चचा अंदाज आहे की, शाही पाहुण्याच्या जन्मावरून निर्माण झालेल्या आर्थिक हालचालींनी ब्रिटनला 2311 कोटी रुपयांचा फायदा होईल. बाळाचा जन्म झाल्याबरोबर अधिकारी पंतप्रधान कार्यालयाला माहिती देतील. एखाद्या शाही जन्माच्या वेळी गृहसचिव उपस्थित राहण्याची कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा पाळली जाणार नाही. महाराणी एलिझाबेथने प्रिन्स चार्ल्सला जन्म दिला त्याच्या काही वेळेपूर्वी ही प्रथा बंद करण्यात आली.

ब्रिटिश प्रसारमाध्यमे केटवर सारखी नजर ठेवून आहेत. गरोदरपणापूर्वीच तिला गर्भवती घोषित करण्यात आले होते. हीदेखील बातमी छापली की, ती जुळ्यांना जन्म देणार आहे. डेली टेलिग्राफने दावा केला की, बाळ केम्ब्रिज मुलगी असेल. तर ‘शाही दांपत्य आपल्या कन्येचे नाव अ‍ॅलेक्झांड्रा ठेवील’, या गोष्टीवर सट्टा लावला गेला.

जन्मासोबतच मिळणारे विशेषाधिकार असूनही शाही मुलांचे जीवन साधेसरळ नसते. मुलांना जन्मत:च आई-वडिलांपासून वेगळे राहावे लागते. प्रिन्स चार्ल्सला वयाच्या आठव्या वर्षी बोर्डिंग शाळेत घातले. राजकुमारी डायनाने अगोदरच्या राजमातांच्या तुलनेत मुलांना पुरेसे वात्सल्य दिले. दिवसरात्र मुलांसोबत राहिली. बाळाचे पालनपोषण कसे करायचे, हे विल्यम-केटला ठरवावे लागेल.

राजघराणे : काही तथ्ये
आजोबा-आजी, तत्कालीन राजा-राणी त्यांच्या खोलीत आल्यास त्यांना दंडवत करण्यात यावा, अशी शिकवण प्रिन्स चार्ल्सला देण्यात आली होती.
महाराणीच्या सर्व मुलांचा जन्म महालात झाला. मात्र राजकुमारी डायनाने ही प्रथा मोडली. प्रिन्स विल्यम आणि हॅरीचा जन्म लंडनच्या सेंट मेरी रुग्णालयात झाला.
1948 मध्ये प्रिन्स चार्ल्सच्या जन्मावेळी लंडनच्या ट्रफल्गर चौकातील कारंजाच्या पाण्याचा रंग निळा करण्यात आला होता.