आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिंस विल्यम आणि केटला सरकारी भेटीत मिळाले कॉन्डम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनचे राजकुमार प्रिंस विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांना फिनलँड सरकारकडून कॉन्डम भेट देण्यात आले आहे. मॅटरनिटी गिफ्टच्या रुपात ही अनोखी भेट देण्यात आली आहे.

केट सध्या प्रेग्नंट असून या महिन्यात शाही परिवारात नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. या निमीत्ताने फिनलँड सरकारकडून शाही जोडप्याला हे गिफ्ट पॅकेज पाठवण्यात आले आहे. शाही जोडप्याला मिळालेल्या या गिफ्ट पॅकेजमध्ये मध्ये केवळ कॉन्डम नसून त्यात नवजात बालकाला आवश्यक असलेल्या अनेक वस्तू आहेत. त्यात खेळणी, क्रीम, पॅड आहे. हा पारंपरिक बेबी बॉक्स फिनलँडच्या सोशल सेक्यूरिटी सर्व्हिस केलाद्वारे पाठवण्यात आला आहे.

ब्रिटनच्या शाही परिवाराने फिनलँडच्या या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला असून फिनलँड सरकारचे आभार मानले आहेत.