आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश राजघराण्यात नवी राजकुमारी येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटिश राजघराण्यात नवीन पाहुणा कोण येणार याचे गुपित अचानक उघड झाले. विशेष म्हणजे डचेस ऑफ केंब्रिज केट कडूनच बोलता-बोलता हे गुपित फुटले आणि राजघराण्यात नवीन राजकुमारी येणार हे जगजाहीर झाले. युवराज्ञी केट ग्रिमस्बी येथे एका कार्यक्रमासाठी गेली असता तिला टेडी बिअर भेट देण्यात आला. ही भेट मिळताच केट म्हणाली, थँक्यू. मी भेट माझ्या मु (लीसाठी) घेऊन जाते. (आय वील टेक दॅट फॉर माय ड (डॉटर)). बोलता-बोलता केट अचानक थांबली. तुम्हाला मुलगी म्हणायचे होते का असा सवाल केला असता केटने उत्तर दिले, आम्ही सांगणार नाही.

सारवासारव : केटच्या बाळंतपणासाठी जुलै महिन्याची तारीख देण्यात आली आहे. केटच्या गरोदरपणानंतर राजघराण्यात नवा पाहुणा कोण येणार याबद्दल ब्रिटनच्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.आपल्याला मुलगी होणार आहे अथवा मुलगा याबद्दल काहीही माहिती नसल्याचा दावा केटने नंतर केला, परंतु अचानक झालेल्या गडबडीमुळे जगभरात आता त्यावर चर्चा सुरू झाली आहे. राजघराण्याच्या परंपरेनुसार बाळाच्या जन्मापूर्वी त्याच्याविषयी माहिती देण्यास मनाई आहे. केटकडून मात्र ही परंपरा अनवधानाने मोडली गेली.