आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकुमारी केटला हवा पहिला मुलगाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनचा राजकुमार विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन यांना मुलगी हवी की मुलगा हा सध्या चर्चेचा विषय आहे. रविवारी केट पहिल्यांदाच आपल्या गरोदरपणाबद्दल जाहीरपणे बोलली. आपणाला मुलगाच हवा आहे, परंतु तिचा पती आणि ब्रिटिश राजघराण्याला मात्र मुलगी हवी असल्याचे तिने एका सैनिकाला सांगितले. हॅम्पशायरमध्ये सेंट पॅट्रिक डे परेडनिमित्त केटने रविवारी आयरिश गार्ड्सला भेट दिली तेव्हा तिने ली व्हीलर या गार्ड्समनला आपली इच्छा बोलून दाखवली. मी राजकुमारीशी तिच्या बाळाबद्दल बोलत होतो. मुलगा होणार की मुलगी हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही त्याचे किंवा तिचे काही नाव ठरवले आहे का? असे लीने केटला विचारले तेव्हा नावाबद्दल तिने नाही असे उत्तर दिले. पहिल्या अपत्याच्या आगमनासाठी आपण खूपच उत्साहित असल्याचे पाच महिन्यांची गरोदर असलेल्या केटने जोसन पेरी या दुस-या सैनिकाला सांगितले.