आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेदन - इंडोनेशियाच्या तुरुंगात शुक्रवारी झालेल्या दंगलीत प्रचंड जाळपोळीनंतर 200 कैद्यांनी यशस्वी पलायन केले. पलायन केलेल्या कैद्यांमध्ये अट्टल गुन्हेगारांबरोबरच दहशतवाद्यांचाही समावेश आहे. त्यात पाच जण ठार झाले. ही घटना देशातील तिस-या क्रमांकाच्या मोठ्या शहरात घडली. पोलिसांनी मेदान परिसरात घेरावबंदी, छापेसत्र सुरू केले आहे.
उत्तर सुमात्राच्या राजधानीत टांजंग गस्टा तुरुंगात ही घटना घडली. कैद्यांनी तुरुंगाची मोडतोड करून आग लावली. ही आग विझवण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या घटनेतील मृतांत तीन तुरुंग कर्मचारी व दोन कैद्यांचा समावेश आहे. तुरुंगात गोंधळ सुरु असतानाच 200 कैदी तेथून पसार झाले.
परंतु पोलिसांनी परिसरात जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यात एक हजारावर पोलिस सहभागी झाले आहेत. टाकलेल्या छाप्यात 55 जणांना पुन्हा अटक करण्यात आली. तुरुंगात 22 दहशतवादी होते. त्यापैकी केवळ तीन जणांना अटक करण्यात यश मिळाले. मृतांमध्ये महिला तुरुंग कर्मचा-याचा समावेश आहे. कैद्यांनी तुरुंग पेटवून दिल्यानंतर 15 अधिकारी त्या ठिकाणी अडकून पडले. तुरुंगातून अनेक मीटरचे आगीचे लोळ आकाशात जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. न्याय विभागाचे उपमंत्री डेनी इंद्रायाना यांनी मेदनमधील तुरुंगाला भेट देऊन पाहणी केली. तुरुंगात जाळपोळ करून पलायन करणा-या कैद्यांवर कडक कारवाई केली जाईल. जे कैदी आत्मसमर्पण करण्यास तयार नसतील त्यांना अशा प्रकारच्या शिक्षेचा सामना करावा लागेल. घटनेत किती जण जखमी झाले याची माहिती मिळू शकली नाही.
वीज नसल्याने अनर्थ
तुरुंगात गुरुवारपासून वीजपुरवठा खंडित होता. वीज नसल्याने पाणीही उपलब्ध झाले नाही. त्यावरून कैद्यांमध्ये प्रचंड संताप होता. त्यातूनच कैद्यांचा उद्रेक झाला व त्यांनी तुरुंगात जाळपोळ केली. तुरुंग रक्षकांच्या हाती असलेल्या बंदुका घेऊन काही कैद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, असे सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.