आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- पाकिस्तानात मोठ्या राजकीय संकटासोबत अंतर्गत बंडाळीही होण्याची शक्यता आहे. एकीकडे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांच्या अटकेत दिरंगाई होत आहे. तर दुसरीकडे सरकारला आव्हान देणारे मौलवी ताहिर-उल-कादरी यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. लाखो समर्थकांसह कादरींनी इस्लामाबादमध्ये धडक दिली होती. सरकारला सत्तेतून हटण्याचा बुधवारपर्यंत त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. त्यामुळे त्यांना अटक केल्यास हिंसाचार उफाळून येऊ शकतो.
प्राप्त माहितीनुसार, कादरी आणि इतर 70 जणांवर इस्लामाबादच्या कोहसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेचे वॉरंटही जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे पंतप्रधानांच्या कटकेत कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लगेच अटकेची कारवाई शक्य नसल्याचे माहिती व प्रसारण मंत्री कमर जमान कैरा यांनी दिली.
या आहेत अडचणी
कथित घोटाळ्याच्या प्रकरणी तपास होईल. त्याचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याबाबत विचार होईल. राष्ट्रीय उत्तरदायित्त्व विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतरच न्यायालयाकडून अटकेचा आदेश निघेल. जामीन न मिळाल्यासच पंतप्रधानांना अटक होईल. त्यामुळे ही प्रक्रीया अतिशय किचकट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.