फोटो - ऑस्ट्रेलियाच्या कोर्टाबाहेर विरोध प्रदर्शन करणारा मोनिस.
आस्ट्रेलियाच्या सिडनीतील मार्टिन प्लेसमध्ये लिंट चॉकलेट कॅफेमध्ये नागरिकांना ओलिस ठेवणा-या हारुन मोनिसला जवानांनी कंठस्नान घातले आहे. 49 वर्षीय मोनिस ईरानी शरणार्थी होता. 1996 मध्ये तो ऑस्ट्रेलियात आला होता. हारूनने त्याच्या आधीच्या पत्नीच्या हत्येच्या आणि इतर अनेक महिलांच्या यौन शोषण प्रकरणी तुरुंगवास भोगला होता. स्वतःला शेख हारुन म्हणवणा-या मोनिसवर बलात्काराची एखूण 47 प्रकरणे सुरू होती. त्याची जामीनावर सुटका झालेली होती. ओलिस प्रकरणाच्या शेवटच्या काही तासांत न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी त्याची ओळख जाहीर करत त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती दिली होती.
1996 मध्ये आला होता ऑस्ट्रेलियात
ईराणचा मोनिस 1996 पासून ऑस्ट्रेलियात राहत होता. अफगानिस्तानात ऑस्ट्रेलियाचे सैनिक पाठवल्याने तो नाराज होता. त्याने तेथे शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना तिरस्कार दर्शवणारी पत्रे लिहिली होती. त्याचे खरे नाव मंतेगी बुजरुदी होते. तो ईराणहून पळून ऑस्ट्रेलियात आला होता. येथे त्याने स्वतःचे नाव हारुन मोनिस ठेवले. स्थानिक मुस्लीम समुदायाने मात्र त्याला महत्त्व दिले नव्हते. पोलिसांच्या मते तो माथेफिरू होता.
न्यायालयात स्वतःला साखळीने बांधले होते
मोनिस 2009 मध्ये एकदा सामाजिक कार्यकर्ता म्हणून हजर झाला होता. पण नंतर त्याच्याच विरोधात आरोप लागले तेव्हा त्याने स्वतःला एका साखळीने बांधून घेतले होते. या प्रकारानंतर मोनिसला तीनशे तास सामुहिक सेवेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
काळ्या जादूच्या नावावर शोषण
ऑस्ट्रेलिया पोलिसांनी मोनिसला वर्ष 2000 आणि 2002 दरम्यान अनेक महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक केले होते. त्याच्यावर काळी जादू, न्यूमरोलॉजी आणि मेडीटेशनच्या नावावर महिलांचे शोषण करायचा असा आरोप होता. 40 हून अधिक महिलांनी त्याच्या विरोधात अशा तक्रारी दिल्या होत्या.
मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या
हारूनने त्याचा मित्र अमीरा द्रौडिसला त्याच्या पत्नीच्या हत्येमध्ये मदत केल्याच्या आरोपात अटक झाली होती. एप्रिल 2013 मध्ये नोलीन हेसन पालला पती अमीराने मोनिसच्या मदतीने हत्या करून मृतदेह जाळला होता. त्याचवर्षी एप्रिल महिन्यात मोनिस जामीनावर बाहेर आला होता. पण लैंगिक शोषणाच्या अनेक आरोपांनंतर त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली.
शोषणाची 47 प्रकरणे
याच वर्षी एप्रिलमध्ये वेंटवर्थ विलेमध्ये मौलवी म्हणून काम करताना त्याच्यावर सात महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी हारूनवर काही आरोपही निश्चित झाले होते. मोनिसवर ऑक्टोबरमध्ये लैंगिक शोषणाचे 40 आणखी आरोप समोर आले होते. यावेळी तो जामीनावर सुटला होता. या सर्व प्रकरणांत 2015 मध्ये त्याला न्यायालयात हजर व्हायचे होते. में उसे अदालत में पेश होना था।
पुढील स्लाइड्सवर पाहा, हारूनचे PHOTO