आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protest Against India In POK After Hanging Of Afzal Guru

अफझल गुरुच्‍या फाशीवरुन पाकव्‍याप्‍त काश्मिरात भारताचा निषेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फराबाद- संसदेवरील हल्‍ल्‍याप्रकरणी दोषी ठरलेल्‍या अफझल गुरुला फाशी‍ दिल्‍यानंतर भारतात जल्‍लोष करण्‍यात आला. परंतु, पाकव्‍याप्‍त काश्मिर आणि पाकिस्‍तानातील लोकांनी भारताचा निषेध केला. विशेषतः पाकव्‍याप्‍त काश्मिरच्‍या लोकांमध्‍ये जास्‍त रोष आहे. या भागातील लोकांनी मोर्चे काढून विरोध केला. तर मुजफ्फराबादमध्‍ये निदर्शकांनी भारताचा राष्‍ट्रीय ध्‍वज पेटविला. ही निदर्शने फुटीरवादी संघटना हुर्रियत कॉन्‍फरंसच्‍या नेतृत्त्वात झाली.

पाकव्‍याप्‍त काश्मिरचे सरकार पाकिस्‍तानच्‍या इशा-यावर नाचते. त्‍यामुळे साहजिकच या भागात अफझलच्‍या फाशीवरुन निषेध होणे अपेक्षित होते. या भागात तीन दिवसांचा राष्‍ट्रीय दुखवटा जाहीर करण्‍यात आला आहे. यादरम्‍यान तेथील शासकीय इमारतींवरील पाकिस्‍तान आणि पीओके सरकारचा झेंडा अर्धा झुकविण्‍यात आला आहे.

पाकिस्‍तानने अफझल गुरुच्‍या फाशीवर सावध प्रतिक्रीया दिली आहे. याप्रकरणी खोलात जाण्‍याची गरज नाही, अशी प्रतिक्रीया पाकिस्‍तानने दिली आहे. पाकिस्‍तानी नेत्‍यांनी फुटीरवादी नेते यासीन मलिकच्‍या उपोषणालाही पाठींबा दिला आहे.