आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांसाचा गोळा म्हणून काढले... तर चार किलोचे बाळ निघाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनेसीमधील एका जोडप्याला एप्रिल महिन्यात कळले की, पुढील पाच तासांत ते आई-वडील होणार आहेत. यूएसए टुडेच्या वृत्तानुसार एरिझोनामधील झेन कोलवॉर्ड या नर्सला वाटत होते की, एका महिलेच्या मूत्रपिंडात खडे आहेत. महिलेला व्हील चेअरमध्ये बसवून लेबर रूममध्ये आणण्यात आले. तिथे तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. अशीच आणखी एक ताजी घटना घडली. मिशिगनमधील महिलेलाही असाच अनुभव आला. एवढे दिवस महिलेच्या पोटात मांसाचा गोळा असल्याचे समजले जात होते, पण अखेरच्या क्षणी ते एक अर्भक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा महिलेला आश्चर्याचा धक्काच बसला. 44 वर्षांच्या लिंडा एक्ले नावाच्या या महिलेने एका चार किलोच्या मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म देईपर्यंत लिंडा यांना माहीत नव्हते की, त्या एका बाळाला जन्म देत आहेत. या घटनेची माहिती लिंडा यांनी फेसबुकवरून आपल्या नातेवाइकांना दिली. लिंडा यांची गर्भावस्था सामान्य नव्हती. जेना पिनकोटा नावाच्या लेखिका सांगतात की, 450 पैकी एका महिलेबाबतीत असा प्रकार घडतो. गर्भावस्थेतील अर्धा काळ जाईपर्यंत महिलेत या अवस्थेची काहीच लक्षणे दिसत नाहीत, तर 2500 महिलांपैकी एका महिलेला बाळ जन्माला येण्यापूर्वीही असे होईल याची माहिती नसते.
(huffingtonpost.com)