लंदन- 'गुर नालों इश्क मिटा'सारखे सुपरहीट गीत देणारे ब्रिटनमधील सुप्रसिद्ध पंजाबी गायक मलकीत सिंह यांच्या कन्येला सेक्स स्कँडलप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. 28 वर्षीय अमरदीप भोपारी असे तिचे नाव आहे. एका अल्पवयीन गतिमंद विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याप्रकरणी अमरदीप भोपारीला दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटनमधील बर्मिंघम कोर्टाचे न्यायाधीश जेम्स बरबिज यांच्या कोर्टाने नुकताच हा निकाल दिला.
मिळालेली माहिती अशी की, अमरदीप भोपारी ही 2013 मध्ये बर्मिंघममधील एका गतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. शाळेतील एका 16 वर्षीय विद्यार्थ्यासोबत अमरदीप हिची ओळख झाली. तो 'डिसलेक्सिया' आणि 'हायपर एक्टिव्हिटी डिसऑर्डर'ने पीडित होता. कारमध्ये तसेच क्लासरुममध्ये विद्यार्थ्यासोबत सेक्स करणे तसेच त्याला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी अमरदीपला दोषी ठरवण्यात आले आहे. अमरदीप हिने पीडित विद्यार्थ्यासोबत तिनदा सेक्स केला होता.