आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या पाळीव कुत्र्याला धूम्रपानाचे व्यसन, सिगारेट ओढल्याशिवाय लागत नाही शांत झोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमधील दोन वर्षांच्या कुत्र्याला आपल्या मालकाप्रमाणेच धूम्रपानाचे व्यसन जडले आहे. मालकाला सिगारेट ओढण्याची सवय आहे. हे व्यसन काही काळानंतर कुत्र्यालाही लागले. त्याला एवढे व्यसन जडले की सिगारेट ओढल्याशिवाय त्याला रात्री शांत झोप लागत नाही.

लिऊ नावाच्या व्यक्तीने गेल्या वर्षी मिया नावाचा कुत्रा घरी आणला. लिऊ सिगारेट ओढत असताना मिया त्याच्याभोवती घुटमळत होता. मालकाच्या सिगारेट ओढण्याचा त्याला आनंद मिळत होता. आता मात्र मियाला सिगारेटचे व्यसन जडले असून त्याला झोपण्यापूर्वी एक सिगारेट लागत असल्याचे हेलोंगजियांग मॉर्निंग पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे.
पुढे वाचा...