बीजिंग- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चीनच्या प्रथम महिला (राष्ट्राध्यक्षांची पत्नी) पेंग लियुआन यांच्या खांद्यावर
आपले ब्लेझर टाकल्याने खळबळ उडाली आहे. पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची पत्नी पेंग लियुआन यांना आपले ग्रे रंगाचे ब्लेझर गिफ्ट केले. ब्लेझर स्विकारताना पेंग यांचे स्मित हास्य कॅमेरात कैद झाले आहे.
पेंग लियुआन आणि पुतिन यांचा व्हिडिओ आणि छायाचित्रे चिनी मीडिया तसेच सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. यानंतर चीन सरकारने न्यूज, फोटो आणि व्हिडिओला चीनी वेबसाइट्सवर बंदी घातली आहे.
चीनमध्ये आयोजित आशिया पॅसिफिक नेशन्समध्ये (अपेक समिट) पुतिन सहभागी झाले होते. यजमान चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची पत्नी पेंग लियुआन या देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे पुतिन हे पेंग लियुआन यांच्या शेजारी बसले होते. शी जिनपिंग हे एका मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा करत असताना पुतिन आणि पेंग लियुआन यांच्यात संवाद सुरु होता. या संवादादरम्यान पुतिन यांना आपला ग्रे रंगाचे ब्लेझर पेंग लियुआन यांना गिफ्ट केला. पुतिन यांना ब्लेझर पेंग लियुआन यांच्य हातात न देता तो थेट त्यांच्या खांदावर टाकला. दोघांचे
...आणि गालातल्या गालात हसल्या पेंग लियुआन
पुतिन यांच्यातर्फे ब्लेझर स्वरुपात गिफ्ट मिळाल्यानंतर पेंग लियुआन यांना स्मित हास्य करत त्यांना धन्यवादही दिले. यावेळी उपस्थित असलेल्या चीनी तसेच विदेशी मीडियाने पुतिन आणि पेंग लियुआन यांच्या हलचाली कॅमेर्यात कैद केल्या. नंतर पुतिन आणि पेंग लियुआन यांचा व्हिडिओ आणि फोटो झपाट्याने इंटरनेटवर पोस्ट झाले.
चीनी सोशल मीडियावर '#Putin Gives Peng Liyuan His Coat' याशिर्षकाखाली व्हिडिओ हजारों युजर्सनी शेअर केला आहे. चीनी प्रशासनाला या घटनेची भनक लागताच चीनी न्यूज साइट्स आणि सोशल मीडियाला व्हिडिओ आणि छायाचित्रांना बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना सपत्नीक भारताचा दौरा केला होता. अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला जिनपिंग यांनी भेट दिली होती. भारताचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जिनपिंग यांचे स्वागत केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियात शेअर झालेला व्हिडिओ आणि फोटो..