आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा चेहरा असलेला Gold Iphone लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियन-इटालियन कंपनीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या चेहर्‍याची प्रतिमा असलेला Gold Iphone लॉन्च केला आहे. सोने आणि टायटेनियम या धातूपासून हा फोन बनवण्यात आला आहे. या फोनची किमत सुमारे १.४१ लाख रुपये आहे.

पुतीनचे माध्‍यम सचिव दमित्री पेस्कोव म्हणाले, कोणत्याही व्यापारी गोष्‍टींसाठी पुतीन यांच्या प्रतिमेचा वापर करु नये. आयफोनवर आपली प्रतिमा झळकलेले पुतीन यांना आवडणार नाही. परिणामी Gold iphne चे उत्पादन तात्काळ बंद केल्याचे, केव्हीयर कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

'त्वरा करा पुतीन फोन मर्यादित आहे, संधी गमवू नका.' अशा टॅग लाईनने केव्हियर कंपनीने आपल्या Gold iphone चे मार्केटिंग केले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, Gold iphone चे फोटो...