आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

G20:युक्रेनवरुन झालेल्या टीकेने नाराज पुतीन यांनी अर्ध्यातच सोडली परिषद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी जी- 20 शिखर परिषद अर्ध्यातच सोडली आहे. आज (रविवार) परिषदेचा दुसरा दिवस आहे. परिषदेच्या सुरुवातीपासून पुतीन येथे आलेल्या नेत्यांवर नाराज आहेत.
रशियाच्या युक्रेनमधील हस्तक्षेपामुळे सर्वच देशांच्या नेत्यांनी पुतीन यांच्यावर टीका केली. परिषदेवर पुतीन यांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे जगतिक अर्थव्यवस्था आणि इबोला संक्रमण यावर जी-20 परिषदेत घेतल्या जाणार्‍या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुतीन यांनी का टाकला जी-20 परिषदेवर बहिष्कार
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याआधी शनिवारी अनेक घटना घडल्या. पश्चिमी देशांनी युक्रेनसंबंधी रशियाच्या भूमिकेवरुन जोरदार टीका केली. पुतीन यांनी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला तेव्हा हार्पर म्हणाल, 'मी तुमच्याशी हस्तांतोलन करेल, मात्र तुम्हाला सांगण्यासारखे माझ्याकडे काही आहे. तुम्ही युक्रेनच्या बाहेर पडले पाहिजे.' अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, 'युक्रेनमधील रशियाची आक्रमकता जगासाठी धोक्याची घंटा आहे.' ब्रिटनने इशारा देताना म्हटले, की रशियाने त्यांच्या शेजार्‍यांना अस्थिर करणे बंद केले नाही तर त्यांच्यावर नवे प्रतिबंध लावण्यात येतील. याच्या उत्तरात पुतीन म्हणाले, आर्थिक प्रतिबंध गैरलागू आणि बेकायदेशीर आहेत.
शनिवारी भोजनालाही गैरहजर
युक्रेनमधील हस्तक्षेपामुळे शिखर परिषदेत झालेल्या टीकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे बैठकीच्या रविवारच्या आपल्या कार्यक्रमात त्यांनी अनेक बदल केले. आयोजकांच्या भोजनालाही त्यांनी हजेरी लावली नाही.
मोदींनी उपस्थित केला काळ्या पैशांचा मुद्दा
प्रत्येकदेशाने बँक खात्यांच्या माहितीची देवाण-घेवाण करण्याचा मुद्दा जी-२० च्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला जाऊ शकतो. अर्थात, एखाद्या भारतीयाचे खाते इतर देशातील बँकेत असल्यास त्यावर भारत सरकार नजर ठेवू शकते. त्यासाठी भारताला इतर देशांच्या परवानगीची गरज भासणार नाही.
आज जाहीरनामा
जाहीरनामा रविवारी जारी केला जाणार आहे. तसे झाल्यास काळ्या पैशांच्या विरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे राजनैतिक यश मानले जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत पाच वर्षांपर्यंत दोन टक्के वृद्धी आणि इंधन सुरक्षेसाठी कच्च्या तेल बाजारात स्थिरतेलाही जाहीरनाम्यात समाविष्ट केले जाऊ शकते.

छायाचित्र - रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी हिल्टन हॉटेल सोडले आणि कारने विमानतळाकडे निघाले.