आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉस्को - रशियापासून जगाला धोका आहे, असे सांगणारी मुखपृष्ठकथा अमेरिकेच्या टाइम या नियतकालिकाने प्रसिद्ध करताच राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे चांगलेच भडकले. नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर पुतीन यांचे छायाचित्र प्रकाशित केल्याने त्यांना अधिकच झोंबले आहे.
रशियात 4 मार्च रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. या पदासाठी पुतीन हे उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर ‘टाइम ’ने ही स्टोरी प्रकाशित करून टाईमिंग साधल्याचे म्हटले जात आहे. ‘रशियाज इनक्रिडिबल श्रिंकींग प्रिमिअर ’अशा ठळक अक्षरावर पुतीन यांचे छायाचित्र आहे.त्यावर पुतीन यांच्या प्रवक्त्याने शुक्रवारी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली. टाईम नियतकालिकातील या लेखाच्या लेखकाला नक्कीच रसोफोबिया आणि पुतीनफोबिया झाला आहे. या फोबियामुळेच या लेखकाचे डोळे नुसतेच विस्फारले आहेत. परंतु त्यांना या डोळ्यांनी वास्तव दिसत नाही.
दुसरे झार - पुतीन यांची वाढती लोकप्रियता पाहून टाइमने त्यांचे वर्णन झार राजांशी केले आहे. पुतीन हे रशियाचे नवीन झार आहेत. पुतीन यांचे मीडियाशी कधीही जमले नाही. चेचन्या येथील वादग्रस्त युद्धाविषयी प्रश्न विचारणा-या फ्रेंच पत्रकाराला पुतीन यांनी अत्यंत वाईट वागणूक दिली होती. 2002 मधील ही घटना आहे. या शिवाय रशियातील असंख्य छोट्या-मोठ्या मीडिया केंद्रावर सरकारचे कडक नियंत्रण असल्याचे खाणाखुणा पाहायला मिळतात, असा दावा टाइममधील लेखातून करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.