आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Queen Beatrix Of The Netherlands To Abdicate Throne

122 वर्षांनंतर मिळणार राजा, आता पर्यंत होते महाराणींचे राज्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँमस्टर्डम - नेदरलँडची महाराणी ब्रिट्रिक्स आपला मुलगा विल्यम्स अलेक्झांडरसाठी राजगादी सोडणार आहे. त्यामुळे तब्बल 122 वर्षांनंतर नेदरलँडला राजा मिळणार आहे. परंतु, अपघातामुळे वर्षभरापासून ते कोमात आहेत.

महाराणी बिट्रिक्स येत्या गुरुवारी 75 वर्षांच्या होत आहेत. 30 एप्रिल रोजी आपण राजसिंहासन सोडणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी दिलेल्या दूरचित्रवाणी संदेशात केली. 33 वर्षांपासून बिट्रिक्स या नेदरलँडच्या महाराणी आहेत. त्यांची आई ज्युलिया यांनीही त्यांच्यासाठी सिंहासन सोडले होते. तसे पाहता नेदरलँडमध्ये महाराणीला फारसे अधिकार नाहीत. तरीही तेथे महाराणी प्रचंड लोकप्रिय आहेत. त्या राजसिंहासन सोडतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती.