आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकॅनिक म्हणून काम करायच्या राणी एलिझाबेथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च 1945 मध्ये काढण्यात आलेले राणी एलिझाबेथ यांचे हे दुर्मिळ छायाचित्र. यात त्या वाहनाचे टायर बदलताना दिसत आहेत. मॅकेनिकल ट्रेनिंग सेक्शन कँबरलमध्ये काढण्यात आलेले हे छायाचित्र अँल्विंगटनच्या यॉर्कशायर एअर म्युझियममध्ये सापडले आहे. दुसर्‍या जागतिक महायुद्धादरम्यान राणी एलिझाबेथ वुमन्स ऑक्झिलरी टेरिटोरियल सेवेत रुजू झाल्या होत्या. येथे त्यांना ड्रायव्हर आणि मॅकेनिकलचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी त्यांनी लष्कराचे ट्रक चालविण्यापासून त्यांची दुरुस्ती करण्यापर्यंतची कामे केलीत. पाच महिन्यानंतर त्यांची ज्युनिअर कमांडर पदावर पदोन्नती झाली. दुसर्‍या जागतिक महायुद्धात लष्करी गणवेश घालून सहभाग नोंदविणार्‍या आणि सध्या जिवंत असलेल्या त्या शेवटच्या हेड ऑफ स्टेट आहेत.