आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Queen Elizabeth Awards Goes To Internet Manufacturers Engineers

\'इंटरनेट\'च्या किमयागारांना \'क्विन एलिझाबेथ\' पुरस्कार जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- 'इंटरनेट' अर्थात माहिती मायाजालाने आता संपूर्ण विश्व व्यापले आहे. आणि हे माहितीचं जाळं विणणार्‍या किमयागारांना उद्या (बुधवारी) 'क्विन एलिझाबेथ प्राईस फॉर इंजिनिरिंग' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बकिंगहॅम पॅलेसमध्ये हा सोहळा होणार असून 10 लाख पौंड असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

टीम बर्नर्स-ली, रॉबर्ट कान्ह, मार्क अँडरसन, विंट सर्फ आणि लुईस पूझिन या इंटरनेट निर्मात्या अभियंत्यांना हा पुरस्कार जाहीर देण्यात येणार आहे. इंटरनेटचे रूपडे बदलण्यात कान्ह, पूझिन आणि सर्फ यांचे मोलाचे योगदान लाभले होते. प्रारंभीच्या काळात इंटरनेटसाठी लागणार्‍या 'मोझेक' ब्राऊझरची निर्मिती अँडरसन यांनी केली होती. परंतु अँडरसन यांना या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याने ते अमेरिकेमध्येच ब्रिटनच्या राजदूताकडून हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

इंटरनेटची निर्मिती करून त्याचा संपूर्ण जगाला फायदा करून देणार्‍या संशोधकांचा एकत्रित सन्मान झाला नव्हता. त्यामुळे या पाच विलक्षण संशोधकांना 'क्विन एलिझाबेथ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष लॉर्ड ब्रोअर्स यांनी सां‍गितले.

स्वीडनचा नोबेल, जपानचा क्‍योटो आणि अमेरिकेचा पुलित्झर या जगभरातील प्रतिष्ठित पुरस्कारांच्या यादीत हा "क्विन एलिझाबेथ‘ पुरस्काराचा समावेश होण्यासाठीही ब्रिटनचे प्रयत्न सुरू असल्याचे ब्रोअर्स यांनी सांगितले.