आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Queen Elizabeth Second Voted Biggest Queen Of England

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलिझाबेथ द्वितिय ठरल्या ब्रिटनच्या सर्वात मोठ्या सम्राज्ञी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- एकीकडे ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाची डायमंड ज्युबिली साजरी होत असतानाच एलिझाबेथ द्वितीय यांचा ब्रिटनच्या सर्वात मोठ्या सम्राज्ञी म्हणून गौरव झाला आहे. एका पाहणीत एलिझाबेथ यांची या स्थानी निवड झाली आहे.
‘द संडे टेलिग्राफ’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीत 86 वर्षीय एलिझाबेथ यांना नागरिकांनी कौल दिला आहे. एलिझाबेथ प्रथम या क्रमवारीत तिस-या स्थानी, तर व्हिक्टोरिया दुस-या स्थानी राहिल्या. हेन्री आठवे व हेन्री पाचवे यांचा राणींनंतर नंबर लागला आहे.
1952 पासून एलिझाबेथ द्वितीय यांचे राज्य सुरू आहे. त्यांना 35 टक्के मते मिळाली. राणी व्हिक्टोरिया यांचा कार्यकाळ 1837 ते 1901 असा राहिला. त्यांना 24 टक्के मते मिळाली. एलिझाबेथ प्रथम (1558 ते 1603 ) यांना 15 टक्के कौल मिळाला होता. हेन्री आठवे यांना तीन टक्के, हेन्री पाचवे यांना एक टक्के एवढी कमी मते मिळाली. 55 टक्के लोकांना एलिझाबेथ यांचे साम्राज्य नेहमीसाठी सर्वात मोठे राहिल, असे वाटते. 28 टक्के नागरिकांना ब्रिटन एक दिवस नक्की प्रजासत्ताक होईल, अशी आशा वाटते. द प्रिन्स आॅप वेल्स हे आपली आई व महाराणीच्या जागी एक दिवस स्थानापन्न होतील, असा विश्वास 58 टक्के लोकांना वाटतो. ड्यूक आॅफ केंब्रिज हे लवकरच या स्थानी येतील, असे 35 टक्के नागरिकांचे मत आहे.

चार्ल्स राजे पण पत्नी महाराणी नाही
ड्यूक आॅफ केंब्रिज चार्ल्स हे राजे झाले तरी त्यांची पत्नी डचेस आॅफ कॉर्नवॉल या मात्र महाराणी पदावर विराजमान होऊ शकत नाहीत, असे 61 टक्के नागरिकांचे मत आहे.