आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Queen Elizabeth Visits Game Of Thrones Set, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणी एलिझाबे‍थ यांना काटेरी सिंहासनाचा तिटकारा, बसण्यास दिला नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्विटरवर शेअर करण्‍यात आलेले राणीचे छायाचित्र) - Divya Marathi
(ट्विटरवर शेअर करण्‍यात आलेले राणीचे छायाचित्र)
बेलफास्ट -ब्रिटिनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) नुकत्याच बेलफास्टमध्‍ये आल्या होत्या. एचबीओ या चॅनलचा प्रसिध्‍द शो 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या सेटवर त्या आल्या होत्या. परंतु, यापेक्षा एका वेगळ्या विषयाची मोठी चर्चा झाली. इंटरनेटवर तर ती चांगलीच रंगली. कारण शोमधील सुंदर अशा स‍िंहासनावर(थ्रोन) त्यांचे न बसणे.
प्रथम त्या तलवारांनी बनवण्‍यात आलेल्या सिंहासन पाहुन आश्‍चर्यचकित झाल्या. त्यावर त्या बसणार हे निश्‍चित होते. त्यासाठी सिंहासनापर्यंत गेल्या. पण अचानक त्यांना त्यावर बसण्‍यास नकार दिला. या निर्णयामुळे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांना राणीचा एक चांगला फोटो आपल्या कॅमे-यात कैद करण्‍याची संधी हुकली. राणीला कदाचित असे वाटले असेल की यापेक्षा आपले सिंहासन कितीतरी पटींने चांगले आहे.

जर राणी एलिझाबेथ त्या सिंहासनावर बसल्या असत्या, तर जगातील माध्‍यमांनी त्यांच्या शासनाला 'पोलिदी स‍िंहासन' म्हणून ओळख दिली असते. परंतु असे काहीही घडले नाही, तरीपण इंटरनेट युजर्सने ते आपल्या अंदा‍जात सिंहासनावर बसवून दिले. येथे दिसत असलेले छाय‍ाचित्र आहे इंटरनेटवरील.

राणीवर ट्विटर नाराजी
राणीने शोच्या सेटवर पोहोचणे आणि सिंहासनावर न बसणे हा ट्विटरवर मोठा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. लोकांनी ट‍ि्वटच्या माध्‍यमातून आपला राग व्यक्त केला. राणीला माहीत होते, की आपण सिंहासनावर बसल्यास इंटरनेटवर काय व‍िस्फोट होईल. त्यांनी त्यामुळे स्वत:ला यापासून वाचवले, असे सारा बर्नाड या महिलेने ट्‍िवट केले आहे.

राणीला वाईट परिणामांची जाणीव होती असे जूल्स मेट्ससन ट्विटरवर लिहिले आहे. जशा राणी सिंहासनापासून दूर झाल्या, तसे संपूर्ण न्यूजरूममध्‍ये निराशा पसरली, असा हाफपोस्टच्या जेसिका एल्गोट यांनी ट्विट केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा शोच्या सेटवर पोहोचलेल्या राणीची छायाचित्रे....