आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quntam Computers Now Exsistance, Big Mathamathical And Chemical Process Easily Understand

‘क्वांटम कॉम्प्युटर्स’ अस्तित्वात येणार, मोठ्या गणिती व रासायनिक क्रिया समजणे शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - शास्त्रज्ञ जगातील सर्वात वेगवान व शक्तिशाली संगणक तयार करण्याच्या कामात महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. या संगणकाचे प्रयोगशाळेतील मॉडेल आकारास आले आहे. स्मार्टफोनमध्ये वापरात असलेले मायक्रोव्हेवजचे तंत्रज्ञान नव्या संगणकामध्ये कसे उपयोगात आणता येऊ शकेल, यावर संशोधनात मुख्य भर दिला जात आहे. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नव्या क्वांटम (पुंज) कॉम्प्युटर्समध्ये अणुकणांचा वापर डाटा साठवण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी होऊ शकेल.


मोठ्या प्रमाणातील डाटा क्वांटम मार्गाने (अ‍ॅटोमिक स्केल आधारित) साठवून त्यावर प्रक्रिया झाल्यास संगणक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून येईल. यामुळे संगणकावर मोठी गणिती तसेच रासायनिक क्रिया समजणे सहज शक्य होणार आहे. क्वांटम कॉम्प्युटर्समुळे नवे औषध तसेच ब्रह्मांड रचनेबाबत अशक्यप्राय वाटणारे प्रयोग समजून घेता येतील. क्वांटम कॉम्प्युटर्सच्या निर्मिती प्रक्रियेत शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर नेटवर्क उभा करू शकणारा ‘अॉटोमिक हायवे’ तयार करण्यासाठी अणुप्रभारित आयन्सवर नियंत्रण मिळवले. सुरुवातीस क्वांटम प्रोसेसरअंतर्गत मोठी गणिती क्रिया पार पाडू शकणा-या स्मॉल स्केल आयन्सवर लेझरचा वापर करण्यात आला. मात्र, अभियांत्रिकी क्षेत्रातील आव्हानात्मक कामे संगणकावर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लेझर्सची आवश्यकता भासते. मायक्रोव्हेवजचा वापर करून क्वांटम- माहिती प्रोसेसरची मोठ्या प्रमाणात उभारणी करता येणार आहे.


मायक्रोव्हेवज व रेडिओ फ्रिक्वेन्सी फील्डचा वापर
क्वांटम कॉम्प्युटरला दिला जाणारा क्वांटम इफेक्ट बाहेरील कुठल्याही गोंगाटामुळे नष्ट होऊ शकतो. मात्र, डॉ. विनफ्रीड हेनसिंगर, सिमोन बेबस्टेर आणि पीएचडीचे विद्यार्थी सेब विड, किम लेक आणि जेम्स मॅकलागलीन यांनी ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये क्वांटम कॉम्प्युटरभोवती आयन क्वांटम तंत्रज्ञान ग्रुप तयार करून बाहेरील आवाजाचा परिणाम रोखू शकणारी ढाल तयार करण्यात यश मिळवले आहे. यामुळे मायक्रोव्हेव क्वांटम कॉम्प्युटरद्वारे मोठ्या प्रमाणातील कामकाज करणे शक्य होणार आहे. मायक्रोव्हेवज व रेडिओ फ्रिक्वेन्सी फील्डच्या साहाय्याने बाहेरील आवाज शांत करू शकणारे अणू तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.