Home | International | Other Country | racism? bbc's jeremy clarkson mocks india

प्रेझेंटर क्लार्कसन यांनी माफी मागावी - केथ वाझ

वृत्तसंस्था | Update - Dec 31, 2011, 11:53 PM IST

भारतीय संस्कृती व नागरिकांबद्दल वंशभेदाची वक्तव्ये करणारे प्रेझेंटर क्लार्कसन यांनी भारताची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी लेबर पक्षाचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी केथ वाझ यांनी केली आहे.

  • racism? bbc's jeremy clarkson mocks india

    लंडन - भारतीय संस्कृती व नागरिकांबद्दल वंशभेदाची वक्तव्ये करणारे प्रेझेंटर क्लार्कसन यांनी भारताची तत्काळ माफी मागावी, अशी मागणी लेबर पक्षाचे वरिष्ठ लोकप्रतिनिधी केथ वाझ यांनी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांनी पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन यांच्यावर शरसंधान केले.
    ख्रिसमसच्या निमित्ताने प्रसारित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात क्लार्कसन यांनी ही वक्तव्ये केली होती. संस्कृती, राहणीमान, प्रसाधनगृह वगैरे बाबतीत क्लार्कसन यांनी भारताची टिंगल उडवली होती. क्लार्कसन यांनी संस्कृतीऐवजी कारविषयी बोलायला हवे होते. त्यामुळे त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. या कार्यक्रमातील काही आशय हा निश्चितपणे आक्षेपार्ह आहे. त्यात विनोद फारसा दिसून येत नाही. काही मुद्दे हे अर्थहीन आहेत. क्लार्कसन यांनी स्वत:ला कॉमेडियन समजू नये. त्यांनी इतर गोष्टींत विनाकारण नाक खुपसण्याचे काय कारण ? असा सवाल त्यांनी केला.
    याच कार्यक्रमात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन हेदेखील उपस्थित होते. यावर आक्षेप घेत वाझ यांनी कॅमरोन यांच्यावर टीका केली. ब्रिटन-भारताच्या संबंधात घनिष्ठता का हवी, यावर कॅमरोन यांनी ख्रिसमसनिमित्ताने केलेल्या भाषणात भर दिला होता. याचे स्मरण वाझ यांनी करून दिले आहे. दरम्यान, क्लार्कसन यांच्या वक्तव्यानंतर बीबीसी या कार्यक्रम प्रसारित करणा-या कंपनीकडे 23 तक्रारी आल्या आहेत.

Trending