आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Raging California Wildfire Poses Threat To San Francisco Power Grid

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅलिफोनिर्यात वणवा पेटला, 1 लाख एकर जंगल जळून खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेन्सो (अमेरिका )- निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या कॅलिफोनिर्या राज्यातील जंगलात वणवा पेटला आहे. शुक्रवारी सिएरा नेवेडातील लाकडांच्या झाडीतून आगीने प्रसिद्ध योसेमिते राष्ट्रीय अभयारण्यात शिरकाव केल्यानंतर कॅलिफोनिर्याच्या अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. सॅन फ्रान्सिस्कोसह योसेमिते अभयारण्यात पर्यटनाचे हे सुगीचे दिवस असतात.मात्र, अग्नितांडवामुळे हजारो पर्यटक माघारी परतले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या वणव्याला थोपवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन हजार जवान प्रयत्नांची शर्थ आहेत.पण केवळ 2 टक्के आग शमवण्यात त्यांना यश आले आहे. सुमारे 424 चौरस किलोमीटरचा (सुमारे 1 लाख 4960 एकर ) भाग आगीच्या वणव्यात सापडला आहे. लाल-पिवळ्या रंगाच्या जीवघेण्या आगीच्या ज्वाळांनी सिएरा नेवेडा परिसरास घेरले आहे.जवळपासच्या भागात काळ्या- पांढ-या धुराचे लोटच्या लोट आकाशात उठताना दिसत आहेत. कॅलिफोनिर्याचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी सॅन फ्रान्सिस्कोपासून 241 किलोमीटरच्या परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे. जवळपासच्या सर्व परगण्यांमध्ये दमा, श्वसनविकार असलेल्या रहिवाशांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सहली तसेच वर्गाबाहेर शैक्षणिक कार्यक्रम घेण्यास शाळांना मनाई करण्यात आली आहे. अमेरिकन वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार 4500 घरे, हॉटेल्स, दुकानांना आगीचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

सॅन फ्रान्स्किकोतील वीज यंत्रणा ठप्प
सॅन फ्रान्सिस्को शहराला वीज पुरवठा करणारे दोन हायड्रोइलेक्ट्रिक विद्युत प्रकल्प बंद करण्यात आले आहेत. शहरासाठी एकूण तीन प्रकल्प आहेत, तर शहराला पाणीपुरवठा करणा-या तळ्यासही धोका असल्याचे सांगण्यात येते.