आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raging Forest Fires In California, News In Marathi

कॅलिफोर्नियात भीषण आग; दीड हजार नागरिकांचा संसार उघड्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेन फ्रान्सिस्को- दक्षिण कॅलिफोर्नियामधील जंगलाला भीषण आग लागल्याने हजारो नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. जंगलाचा आजुबाजुच्या परिसरातील हजारो नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. आतापर्यंत दीड हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले आहे. जंगल परिसरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. आगीने रौद्र रुप धारण केले अजून अर्धापेक्षा जास्त परिसर आगीने वेढला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

अग्निशमन विभागाचे प्रवक्ता ब्रेन ग्रांट यांनी सांगितले, की सॅन बार्नार्डिनो नॅशनल फॉरेस्टमध्ये बुधवारी (30 एप्रिल) सकाळी अचानक आग भडकली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण करत काही कालावधीतच 1,627 एकर परिसराला वेढले. सुमारे 900 फायरफायटर्स आग विझविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सोसाट्याचा वारा सुरु असल्यामुळे आग पुन्हा वाढत आहे. आग विझण्यासाठी अनेक दिवसही लागू शकतात असेही ग्रांट यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, कॅलिफोर्नियातील आगीचे रौद्र रुप...