आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Narendra Gandhi India Election 2014 Amethi Loksabha

बालेकिल्ल्यातच राहुल गांधी संकटात; \'न्यूयॉर्क टाइम्स\'चा दावा,वाचा कव्हरेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 16 व्या लोकसभा निवडणुकीच्या वृत्ताला अमेरिकेसह अन्य राष्ट्रातील माध्यमेही प्राथमिकता देताना दिसत आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर बहुतांश वृत्तपत्रे लक्ष ठेवून आहेत. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने राहुल गांधीबाबत धक्कादायक खुलासा प्रसिद्ध केला आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघ हा गांधी-नेहरू कुटूंबियांचा पारंपरिक गड आहे. परंतु कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातच कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी संकटात सापडले असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे.

याशिवाय न्यूयॉर्क टाइम्सने 2004 मधील एका घटनेचा दाखलाही दिला आहे. राहुल गांधी यांच्या वर्तवणुकीबाबत अमेठीतील कॉंग्रेसचे काही कार्यकर्ता नाराज झाले होते. राहुल गांधी यांना अमेठीतील कॉंग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांची नावे तरी माहीत आहेत का? असा प्रश्न एका बैठकीत करण्यात आला होता. यावेळी राहुल गांधी यांनी 'नाही' अशी मान हलवली होती.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (1 मे) चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या दोन स्फोटाच्या घटनेला प्राथमिकता देण्यात आली आहे. या स्फोटात एक महिला ठार झाली तर 11 जण गंभीर जखमी झाले.

पुढे पाहा, विदेशी मीडियातील कव्हरेज...