आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rail And Air Traffic Disturbed In London After Heavy Snowfall

लंडनमध्‍ये तुफान बर्फवृष्‍टी; अनेक विमाने रद्द, प्रवासी खोळंबले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- गेल्‍या चार दिवसांपासून लंडनमध्‍ये तुफान बर्फवृष्‍टी होत आहे. त्‍यामुळे लंडनच्‍या हीथ्रो विमानतळावरील विमान वाहतूक पूर्णपणे विस्‍कळीत झाली असून सुमारे 1 हजार उड्डाणे रद्द करण्‍यात आल्‍याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्‍यामुळे हजारो प्रवासी लंडनमध्‍ये अडकून पडले आहेत.

लंडनमध्‍ये प्रचंड बर्फवृष्‍टीमुळे सुमारे 8 सेंटीमीटर जाडीचा बर्फाचा थर साचला आहे. त्‍यामुळे कडाक्‍याची थंडी पसरली असून जनता हैराण झाली आहे. तर विमानतळावर हजारो प्रवासी अडकले आहेत. बर्फवृष्‍टीमुळे केवळ विमानसेवाच नव्‍हे, तर रस्‍ते वाहतूक आणि रेल्‍वेसेवाही विस्‍कळीत झाली आहे. बर्फ आणि दाट धुक्‍यामुळे इग्‍लंडमधील अनेक रेल्‍वेगाड्या विलंबाने धावत आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरावठाही खंडित झाला आहे.