आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केनियात वाहताहेत परिवर्तनाचे वारे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केनियातील निवडणुकांमध्ये उहुरू केन्यट्टा नवीन राष्ट्राध्यक्ष बनण्यात यशस्वी झाले. 2007 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मवाई किबाकींच्या वादग्रस्त विजयानंतर देशात जातीय हिंसाचाराचे नवे लोण पसरले होते. नवीन राष्ट्राध्यक्षांसमोर अनेक आव्हाने आहेत; परंतु काही मुख्य प्रकरणांमध्ये लवकर पावले उचलली तर ही निवडणूक देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयात हजेरी : केन्येट्टांना 2007चा हिंसाचार भडकावल्याच्या आरोपांना उत्तर द्यावे लागेल.
जनमानसातील प्रतिमा बदलणे : सात वर्षांपर्वी झालेल्या हिंसाचारात हजारोंचा मृत्यू झाला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केनियाची प्रतिमा मलिन झाली होती.

दहशतवादी हल्ले रोखणे : अल शबाबने इशारा दिलाय की दक्षिणी सोमालियातून केनियाने शांती सैन्य माघारी बोलवावे; अन्यथा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.

जातीय तेढ कमी करणे : केनिया आणि सोमालियातील आश्रितांचा दावा आहे की, त्यांना सरकारी अधिकारी आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागतोय.