आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 77 ठार, घातपाताची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅंतिआगो- उत्तर स्पेनमधील सॅंतिआगो डी कोंपोस्तेला या शहराजवळ रेल्वेचे डबे घसरुन आणि एकमेकांवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात 77 जणांचा मृत्यू झाला. तसेच 140 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु याबाबत स्पॅनिश सरकारीकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, माद्रिद येथून फेरोल येथे जाणार्‍या या रेल्वेला अपघात झाला. विशेष म्हणजे येशु ख्रिस्ताचे शिष्य असलेल्या सेंट जेम्स यांच्या स्मरणार्थ या सॅंतिआगो डी कोंपोस्तेला शहरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. उत्सवासाठी येथे हजारो ख्रिश्‍चनधर्मीय गोळा होत असतात. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा अपघात झाल्याने सॅंतिआगो डी कोंपोस्तेला शहरावरही दु:खाची छाया पसरली आहे. यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राजोय हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. या अपघाताबाबत त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.