आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेवर दरोडा, 29 वेळा अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अनेक रेल्वेंवर दरोडा, असंख्य बसमध्ये लूट प्रकरणात अमेरिकेतील एका गुन्हेगाराने विक्रम केला आहे. दरोड्यात त्याला आतापर्यंत 29 वेळा अटक झाली. त्याला अमेरिकेतील प्रत्येक रेल्वेस्थानक, उपनगरातील स्थानकांची बारकाईने माहिती आहे. डॅरिस मॅक्लम असे त्याचे नाव आहे. किशोरवयापासून त्याने दरोड्याला सुरुवात केली. डॅरिस केवळ लुटीवर थांबला नाही, तर त्याने बसच्या बस चोरल्या आहेत. एखाद्या कंडक्टरच्या वेशात येऊन डॅरिस छाप टाकतो आणि सराईतपणे गाड्या पळवतो. वयाच्या आठव्या वर्षी त्याला रेल्वेचा मार्ग अगदी पाठ होता. तेव्हापासून रेल्वेवर प्रेम करतो, असे तो गमतीने सांगतो. आयुष्याची एकतृतीयांश वर्षे त्याने तुरुंगात घालवली आहेत.