तेल अविव -
इस्रायलसोबतचे संबंध आणखी बळकट करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे बुधवारी रात्री येथे आगमन झाले. या दौ-यात इस्रायलसोबतच्या सुरक्षा सहकार्यावर तसेच दहशतवादविरोधी लढ्याच्या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार आहे.
राजनाथ सिंह यांनी येथे पोहोचल्यावर केलेल्या टि्वटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची गुरुवारी रात्री भेट घेतली जाईल, असे सांगितले. भविष्यामध्ये दोन्ही देशांतील संबंध बळकट करण्यावर भर दिला जाईल. राजनाथ यांनी जेरूसलेममधील धार्मिक स्थळांना भेट देऊन दौ-याची सुरुवात केली. यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार योसी कोहेन यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून जॉर्डन खोरे व इस्रायलच्या उत्तर व दक्षिण भागातील सुरक्षा स्थितीची पाहणी केली. कोहेन यांच्या दिल्ली दौ-यात दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.