आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द. आफ्रिकेत गांधीजींच्या मोर्चाच्या स्मरणार्थ मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेमधील गो-या साहेबांच्या राजवटीच्या काळातील भेदभावपूर्ण कायद्यांच्या विरोधात महात्मा गांधी यांनी 1913 मध्ये काढलेल्या ऐतिहासिक मोर्चाच्या शतकपूर्तीनिमित्त दक्षिण आफ्रिकेत शेकडो नागरिकांनी गांधीजींचे पुण्यस्मरण करत मोर्चा काढला.
गांधीजींच्या या ऐतिहासिक मोर्चाची शतकपूर्ती साजरी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथून पीटरमारिट्सबर्ग, लेडीस्मिथ आणि इतर शहरांना जोडून न्यूकॅसल येथे जाणारी एक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली होती. गेल्या रविवारी डर्बन येथून पहाटे दोन वाजता या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. शेकडो लोकांचा सहभाग असलेला हा मोर्चा दुपारी दीड वाजता न्यूकॅसल येथे विसर्जित करण्यात आला. याच दिवशी चार्ल्सटाऊन येथूनही ऐतिहासिक व्होल्क्सरस्ट तुरुंगापर्यंतही मोर्चा काढण्यात आला होता. भारतीय कामगारांवरील अन्यायकारक कर, हिंदू आणि मुस्लिमांमधील लग्नांना मान्यता न देण्याच्या कायद्याविरोधात गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत 1913 मध्ये हे ऐतिहासिक आंदोलन केले होते.