Home | International | China | ramdev baba is corrupt : bks iyengar

'कपालभाती' विकून रामदेव बाबांनी योगास भ्रष्ट केले - बीकेएस अय्यंगार

Agency | Update - Jun 22, 2011, 12:35 PM IST

एक योग गुरू नऊ दिवसातच उपोषण संपवतो. यावरून त्यांच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित केली आहे

  • ramdev baba is corrupt : bks iyengar

    बीजिंग - पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ योग गुरू बी. के. एस अय्यंगार यांनी रामदेव बाबांनी नऊ दिवसातच संपवलेल्या उपोषणावर टीका केली. एक योग गुरू नऊ दिवसातच उपोषण संपवतो. यावरून त्यांच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित केली आहे. 'कपालभाती'सारखे योग 'आसन' म्हणून विकून पतंजलि योगास ते भ्रष्ट करीत आहेत.

    सध्या अय्यंगार चीनमध्ये आपल्या भक्तांना योग शिकवत आहेत. नुकताच बिजिंग पोस्ट कार्यालयाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकिट प्रकाशित केले आहे. रामदेव बाबांनी नऊ दिवसांतच आपले उपोषण संपविल्यामुळे भारतातील अनेक योग गुरूंनी त्यांच्यावर टीका केली होती. योगसाधना करणारा माणूस मानसिक आणि शारिरीकदृष्टया मजबूत असतो. त्यामुळे कित्येक दिवस तो काहीही न खाता-पिता राहू शकतो. भारतातील योग गुरूंनी रामदेव बाबांची तुलना स्वामी निगमानंद यांच्याशी केली. स्वामी निगमानंदांनी काहीही न खाता-पिता ११४ दिवसांपर्यंत उपोषण केले होते. स्वामी निगमानंद यांच्यासारख्या कित्येक लोकांनी कोणत्याही अडचणी शिवाय काहीही न खाता-पिता उपोषण केले आहे, असे भारती शर्मा या योगासन करणा-या विद्यार्थीनीने सांगितले. अय्यंगार यांनी रामदेव बाबांचे नाव घेतले नसले तरी पण त्यांचा रोख रामदेव बाबांकडेच होता. 'कपालभाती'ला विकणारे योग गुरू पतंजली योग केंद्रास भ्रष्ट करीत आहेत असे ते म्हणाले.

Trending