आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramsoon Storm Will Increase Weak Monsoon; News In Marathi

‘रामासून’मुळे चीनमध्ये 17 ठार, 33 लाख बेघर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- दक्षिण चीनला बसलेल्या रामासून चक्रीवादळाच्या तडाख्यात मृतांची संख्या 17 झाली आहे. आतापर्यंत 33 लाख लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. गेल्या चार दशकांतील हा सर्वात मोठा तडाखा आहे.

ग्वाँगदाँग व हेनॉनसह स्वायत्त ग्वाँगझी झुआँगच्या दक्षिण किनारपट्टीवरील अनेक शहरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे वीज आणि पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडून पडली आहे. दूरसंचार, बंदरे आणि रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे सुमारे 51 हजार घरे आणि 40 हजार 600 हेक्टर परिसरातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सुमारे 4 हजार 548 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. फिलिपाइन्समध्ये वादळामुळे मृतांचा आकडा 100 वर पोहोचला आहे. नागरिकांना आणखी एका वादळाला सामोरे जावे लागणार आहे, असे हवामान खात्याचे भाकीत आहे.

नवे वादळ मॅटमो
एक नवे वादळ मॅटमो ताशी 150 किमी वेगाने येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच पाऊस होत आहे. फिलिपीन्समध्ये सध्या 16 लाख नागरिकांना वादळाने फटका बसला आहे.