आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rare 5 Meter Megamouth Shark Cought By Philippines Fisherman News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: मासेमारांच्या जाळ्यात अडकला दात नसलेला \'मेगामाउथ शार्क\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: फिलिपाइनमध्ये मासेमारांच्या जाळ्यात अडकलेला 15 फूट लांबीचा मेगामाऊथ शार्क)

मनीला- फिलिपाइनमधील मासेमारांच्या जाळ्यात एक दुर्मिळ मासा 'मेगामाउथ शार्क' अडकला आहे. 'मेगामाउथ शार्क' नावाप्रमाणे या माशाचा जबडा विशाल आहे. मात्र, या माशाला दात नसतात. पाच मीटर (15 फूट) लांबी असलेल्या या माशाला अलबे आणि मास्बेट प्रांतातील बारंगे मॅरिगोन्डोन समुद्र किनार्‍यावर पकडण्यात आले.

'मेगामाउथ शार्क' ही माशाची दुर्मिळ जात अाहे. या जातीचे फक्त 63 मासे जिवंत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे 'मेगामाउथ शार्क'ला फिलिपाइनमधील 'वाइल्डलाइफ सेंटर अलबे पार्क'मध्ये डिस्प्लेच्या रुपात ठेवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक मासेमारांनी या शार्क माशाला 'टूथलेस फिश' (दात नसलेला मासा) असे नाव दिले आहे. पहिल्यादा असा दुर्मिळ मासा जाळ्यात सापडल्याचे मासेमारांनी सांगितले.

इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ साउथेम्पटन'मध्ये 'शार्क'वर संशोधन करणारे स्टूडेंट क्रिस्टोफर बर्ड यांनी सांगितले की, 1976 नंतर पहिल्यांदा असा दुर्मिळ जातीचा मासा पाहायला मिळाला आहे. 'मेगामाउथ शार्क'ची लांबी 5.2 मीटरपर्यंत (17 फूट) असते. विशेष म्हणजे या माशाचे आयुष्यमान 100 वर्षे असू शकते.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, दात नसलेल्या 'मेगामाउथ शार्क'चे फोटो...