आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Video Of Rocket Launch From Gaza, Divya Marathi

हमासचे दहशतवादी इस्रायलवर तंबूतून करतात क्षेपणास्त्रांनी हल्ले, पाहा VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(साभार - एनडीटीवी)

गाझा/ जेरूसलेम - गाझापट्टीतून हमास ही दहशतवादी संघटना रहिवाशी भागातून इस्रायलवर कशा पध्‍दतीने हल्ले करते याचा व्हिडिओ समोर आला आहे. इस्रायल-हमासमध्‍ये मंगळवारी (ता.5) 72 तासांची शस्त्रसंधी होण्‍यापूर्वी एनडीटीव्ही 27 बाय 7 या इंग्रजी वृत्तवाहिनीचा वार्ताहर श्रीनिवासन जैन याने गाझावरील युध्‍दाची सद्य‍:स्थिती शूट केली. त्यात दहशतवादी हॉटेलच्या बाहेर लावण्‍यात आलेल्या तंबूतून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करत असल्याचे दिसत आहे.

व्ह‍िडिओत काय आहे?
जैन यांनी पॅलेस्टाइनच्या रहिवाशी भागात सोमवारी (ता.4) व्हिडिओ रेकॉर्ड केला. यात तीन दहशतवादी क्षेपणास्त्र तयार करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी ते क्षेपणास्त्र इस्रायलवर टाकले. व्हिडिओ स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता रेकॉर्ड करण्‍यात आला.

गाझापट्टीतून बाहेर आल्यानंतर प्रसिध्‍द केला व्हिडिओ
वाहिनीचा वार्ताहर श्रीनिवास जैन भारतात आल्यानंतर एनडीटीव्ही 24 बाय 7 ने गाझापट्टीवर शूट केलेला व्हिडिओ प्रसारित केला. हमास इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्‍यासाठी गाझावरील रहिवाशी भागाचा वापर करत असल्याचे फुटेजमध्‍ये दिसत आहे.

जगभरात व्हिडिओची चर्चा
इस्रायली लष्‍कर आणि जगभरातील माध्‍यमांत हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

इस्रायलवर कारवाईची गरज
इस्रायलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे पॅलेस्टाइनचे परराष्‍ट्रमंत्री रियाद अल-मलिकी यांनी मागणी केली आहे. त्यासाठी मलिकी मंगळवारी(ता.5) नेदरलँडमधील हेग शहरातील आंतरराष्‍ट्रीय न्यायालयात पोहोचले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा हमासच्या हालचाली आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ....