आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rashi Kapoor Fake Her Miss India Australia Title

ऑस्ट्रेलियातील मोदींचा इव्हेंट वादाच्या भोव-यात, तोतया मिस इंडिया होती होस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स‍िडनी - सिडनीमध्‍ये सोमवारी (ता.17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्‍यात आले. हा कार्यक्रम वादाच्या भोव-यात सापडला आहे.कार्यक्रमाची होस्ट राशी कपूरने कार्यक्रमात आपण मिस इंडिया ऑस्ट्रेलिया असल्याचे सांगितले. पण वास्तवात ती कधीही मिस इंडिया ऑस्ट्रेलिया झालीच नाही. याबाबत प्रसिध्‍द केलेल्या पत्रकात मिस इंडिया ऑस्ट्रेलिया कॉर्पोरेशनने स्पष्‍टीकरण दिले आहे.
मिस इंडिया ही स्पर्धा आयोजन करणा-या मिस इंडिया ऑस्ट्रेलिया कॉर्पोरेशनच्या संचालिका रीना कोक यांनी एक पत्रक प्रसिध्‍द केले आहे. त्यात म्हटले आहे, की राशी कपूरने ऑस्ट्रेलियन आणि आंतरराष्‍ट्रीय मीडियाच्या माध्‍यमातून एलफोन्स एरिनामध्‍ये भारतीय समुदायांने आयोजित केलेल्या स्वागत कार्यक्रमात स्वत: मिस इंडिया ऑस्ट्रेलिया असल्याचे सांगितले. परंतु राशी कधी या सन्मानाची मानकरी नव्हतीच.
र‍ाशी कपूरने या आपल्या चुकीच्या कृत्याची माफी मागावी. तसेच तिने लोकांना योग्य माहिती द्यावी, अशी संस्थेची मागणी आहे. राशीने आपल्या फेसबुक पेजवर या आरोपाला उत्तर दिले आहे. त्यात ती म्हणते, की 2013 मधील मिस इंडिया ग्लोबल युनायटेड किताब जिंकला होता. मीडियाने चुकून मिस इंडिया ऑस्ट्रेलिया सांगितले असेल.
पुढे पाहा... राशी कपूरचे वेगवेगळी छायाचित्रे...