आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका व पाश्चिमात्य देशांना पुतीन भारी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायमन शूस्टर/ग्रेबोव्हो- पूर्व युक्रेनमध्ये मलेशियन एअरलाइन्सचे बोइंग 777 पाडण्याच्या मुद्यावरून अमेरिका, पाश्चात्य देश आणि रशियादरम्यान ओढाताण सुरू आहे. रशियाच्या सरकारी नियंत्रण असलेल्या पाश्चात्य देशांविरोधी प्रसारमाध्यमांच्या प्रचारात रशियाची भूमिका सौम्य झाली आहे. तिकडे युरोप आणि अमेरिकेचे नेते पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासमोर लाचार दिसत आहेत. अमेरिकन गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे की, विमानावर क्षेपणास्र हल्ल्यात रशियासमर्थक बंडखोरांचा हात आहे. तरीही अमेरिकन मुत्सद्यांना रशियाविरुद्ध कडक निर्बंध लावण्यासाठी युरोपियन राष्ट्रांना एकत्र करणे अवघड होत आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रट यांच्या पुढाकाराने काही निष्पण्ण झाले नाही. एमएच 17 घटनेत 298 मृतांत 193 डच आहेत.
युरोपात मतभेद निर्माण करणे, नाटोमध्ये फूट पाडणे आणि जगात रशियाचा प्रभाव पुन्हा निर्माण करण्यावर त्यांची भर आहे. क्रिमियावर रशियन कब्जा झाल्यावर अमेरिका, युरोपने लादलेल्या निर्बंधांनी पुतीन यांच्यावर काही परिणाम झाला नाही. युरोपात पुतीन यांच्यासोबत
इटलीसारखे अनेक मित्र आहेत. इटलीने रशियावर आर्थिक निर्बंधांना विरोध केला आहे. फ्रान्सने अमेरिका, ब्रिटनच्या हरकतीनंतरही रशियाला हेलिकॉप्टर कॅरिअर विकण्याचा निर्णय घेतला आहे. 22 जुलैला युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत रशियावर तितके कडक निर्बंध लावले नाहीत, जितके अमेरिकेने लावले आहेत.

नेदरलँडच्या तपासाने पुतीन यांच्यासाठी काही अडचण पुढे येणार नाही. ब्रिटिश तज्ज्ञ विमानाच्या फ्लाइट रेकॉर्डरचा तपास करत आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञ विमानाचे अवशेष तपासून पाहात आहेत.