आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत आजही अस्तित्त्वात आहे रावणाचे साम्राज्य! पाहा छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्याचा असत्यावर विजय म्हणून संपूर्ण भारतात 'विजया दशमी' (दसरा) हा सण मोठ्या हर्षउल्हासात साजरा केला जातो. रामाने श्रीलंकेवर विजय म‍िळवून रावणाचा वध करून पत्नी सीतेला अयोध्येत परत आणले होते. रावण लंकेचा राजा होता. तो समुद्रापार राहत होता. पौराणिक कथांमधील आलेल्या उल्लेखानुसार रावणाने सोन्याची लंका बनवली होती. आज श्रीलंका नावाने ती ओळखली जाते. रावणाने घात करून सीतेचे अपहरण करून श्रीलंकेत नेले होते. परंतु श्रीराम प्रभुंनी वानर सेनेच्या मदतीने समुद्रात सेतू बांधून श्रीलंकेत रावणाचा वध करून सीता मातेला पुन्हा अयोध्येत परत आणले होते. लंका महलाचा कोणताही अवशेत सापडत नसला तरी तेथे रावणाचे प्राचिन मंदिर, गुफा आणि झरे आजही रावण इला येथे अस्तित्त्वात आहे. ही गुफा घनदाट जंगालात असून उंच डोंगरावर आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा; 'रावण गुफा, मंदिर आणि झरे'