आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Readiness Of Constitutional Election : Nepal Turn Into Army Camp

तयारी घटनासभेच्या निवडणूकीची: नेपाळला छावणीचे स्वरूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळमध्ये घटनासभेच्या निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 62 हजार लष्करी जवान निवडणूक ड्युटीवर आहेत. 601 सदस्यांच्या घटना सभेसाठी 19 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. माओवादी गटाव्यतिरिक्त 33 पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीदरम्यान हिंसाचार उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीच्या रिंगणात 6200 उमेदवार आहेत. त्यात 667 महिला उमेदवार आहेत. येथील निवडणुकीवर भारत व चीन या दोन्ही देशांचे लक्ष आहे. भारताकडून निवडणूक सामग्री पुरवली जात आहे. 12 लाख मतदार 120 पक्षांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.