आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ready For \'prolonged\' Gaza War, Warns Israel PM Netanyahu, Divya Marathi

दीर्घकालीन गाझा युध्‍दासाठी तयार राहा, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा सिटी - इस्रायल गाझावरील आपली कारवाई आणखी तीव्र करणार आहे, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला. इस्रायलने दीर्घकालीन युध्‍दासाठी तयार राहवे. पॅलेस्टिनींनी लवकरात लवकर आपले घर सोडवे, असे त्यांनी म्हटले. हमास-इस्रायल दरम्यान झालेल्या घमासान युध्‍दात नऊ मुले मारली गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर नेतान्याहू यांनी हमासला हा इशारा दिला आहे. मुलांच्या मृत्यूबाबत इस्रायल-हमास एकमेंकांवर आरोप करित आहेत, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिका-याने सांगितले.
इस्रायलच्या रणगाड्यांनी पुन्हा एकदा गाझावर तोफगोळा डागण्‍यास सुरू केले. हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून यात तीन मुले आणि 70 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे, तर जेबालिया शहरात 50 जण जखमी झाली. हा भाग खाली करण्‍याची पूर्व सूचना देण्‍यात आली होती, असे रेड क्रेससेन्ट यांनी सांगितले. हल्ल्यामुळे कोणीही घर सोडून देण्‍याचे तयारीत नाही, असे जेबालियाच्या रहिवाशांनी स्पष्‍ट केले. सुफ‍िन अबेद रब्बो यांनी सांगितले, की त्यांच्या 17 जणांच्या कुटूंबाने घरातील जिन्या खाली आश्रय घेतला होता.