आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reasons Why Sochi\'s Olympics Most Controversial

आतापर्यंतचा सर्वांत महागडे ऑलिम्पिक सुरु होतेय सोचीमध्‍ये, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोची: रशियामधील कालासागर सोचीमध्‍ये 7 फेब्रुवारीपासून 'विंटर ऑलिम्पिक' सुरु होत आहे. या स्‍पर्धा तब्‍बल 20 दिवस चालणार आहेत. हे आतापर्यंतचे सर्वात महागडे ऑलिम्पिक आहे. रशियाने या ऑलिम्पिकवर 3.19 लाख कोटी रुपये खर्च केला आहे. यापूर्वी 2008 या वर्षी चीनमध्‍ये झालेल्‍या ऑलिम्पिकवर चीनने 2.50 लाख कोटी रुपये खर्च केला होता.

भारतास प्रतिबंध
आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक संघाने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला यामधून निलंबित केले आहे. परंतु ऑलिम्पिक ध्वज नियमाअंतर्गत भारतीय ध्‍वजास सांभाळण्‍यासाठी तीन खेळाडू सहभागी होणार आहेत. हिमांशु ठाकूर, लदीम इकबाल आणि केशवन हे खेळाडू त्‍यात सहभागी होतील.

विंटर ऑलिम्पिक
7 प्रकारचे खेळ
88 देशांचा सहभाग
98 इव्‍हेट्स
2500 खेळाडूंचा सहभाग

वादाची कारणे
कालासागर येथ्‍ो 1864 मध्‍ये झालेल्‍या सिरकेशियन हत्‍याकांड झाले होते त्‍याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या हत्‍याकांडाच्‍या वाईट स्‍मृती पुसण्‍यासाठी या स्‍पर्धांचे आयोजन केल्‍याचे सोगितले जात आहे.

या स्‍पर्धावर दहशतवादाचे सावट असून, मोठ्या हल्‍ल्‍याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे. या स्‍पर्धांमध्‍ये 230 खेळाडू अमेरिकेचे आहेत. तर 225 खेळाडू रशियाचे आहेत.

ऑलिम्पिकच्‍या तयारीची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...