आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्राचे शांती सैनिक ओलिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सिरियातील बंडखोरांनी गोलन हाइट्स भागात असलेल्या 21 शांती सैनिकांना ओलिस ठेवले आहे. ओलिसांची सुटका होण्यासाठी बंडखोरांशी वाटाघाटी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

सिरिया आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदी असलेल्या भागातील उत्तरेकडील राका शहरावरदेखील बंडखोरांनी ताबा मिळवला. बंडखोरांनी ओलिस ठेवलेले शांती सैनिक फिलीपीन्सचे आहेत. ओलिसांची तत्काळ सुटका करण्यात यावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी केले. बंडखोरांकडून करण्यात येणार्‍या स्वातंत्र्य चळवळीचा आणि सुरक्षेचा आदर सरकारने करावा, असे असाद यांना सूचित करण्यात आलेआहे. बंडखोरांसोबत या मुद्द्यावर वाटाघाटी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. ओलिसांची लवकर सुटका करण्यात यावी.

फिलीपीन्सच्या 300 शांती सैनिकांमधील सदस्यांचा त्यात समावेश आहे. ओलिसांना पाहुण्यासारखी वागणूक मिळत असली तरी त्यांची सुटका करण्याची मागणी फिलीपीन्स सरकारने केली आहे.