इंटरनॅशनल डेस्क - स्कॉटलंडने ब्रिटनसोबतचे 300 वर्षे जूने संबंध संपुष्टात आणण्याची तयारी केली आहे. गुरुवारी स्कॉटलंडचे 42 लाख स्कॉटिश नागरिक इंग्लंडसोबतचे संबंध तोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यापुढे ते ब्रिटीश यूनियनचे प्रतिक असलेला ध्वज नाकारणार आणि ब्रिटनची महाराणी व त्यांचे चलन 'पाउंड'ला यापुढेही मान्यता देणार, याबद्दल तर्क लावले जात आहेत.
स्कॉटलंडमध्ये जनमत संग्रह करुन तेथील नागरिकांना ब्रिटनसोबत राहायचे की नाही याचा निर्णय होणार आहे. येथील नागरिकांनी होय असे बहुमताने सांगितल्यानंतर स्कॉटलंड वेगळे होईल. पण काही प्रश्नांची उत्तरे अद्याप शोधली गेलेली नाहीत. नवीन देशाचे चलन कोणते असेल, राज्यकर्ते कोण असतील, घटना काय असेल, तसेच स्कॉटलंड युरोपीय संघाचे सदस्य होणार किंवा नाही?
यासोबतच या सर्व प्रकरणामध्ये अजून हे देखील स्पष्ट झालेले नाही, की ब्रिटन आणि स्कॉटलंड यांच्यात मुद्दा कोणता आहे. यांच्यात भाषेचे भांडण नाही. स्कॉटलंडची स्वतंत्र संसद आहे. आरोग्य आणि शिक्षणाबद्दल स्कॉटलंड स्वायत्त अधिकार आहेत. अशाच पद्धतीने जर वेल्स आणि उत्तर आयर्लंड याच मार्गाने गेले, तर ज्या राज्यावर कधी सूर्य मावळत नव्हता ते फक्त इंग्लंडपूरतेच राहून जाईल.