आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वत:च्या अत्यंयात्रेची रिहर्सल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कोलोरॅडो येथे राहणा-या जिम गॅनहार्ट यांनी 1951 मध्ये स्वत:च्या अंत्ययात्रेचा सराव केला होता. ते शेती करत होते. आपल्या माघारी कुटुंबातील सदस्य कसे जगतील, हे त्यांना पाहायचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या अंत्ययात्रेचा सराव करून पाहिला. गेनहार्ट यांनी हेडस्टोन आणि पुरण्यासाठी 25 हजार रुपयांत जमिनीही खरेदी केली होती.

स्थानिक वर्तमानपत्रांत त्यांचा शोकसंदेशही प्रकाशित करवून घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी वाचल्या जाणा-या शोकसंदेशात म्हटले गेले की, गेनहार्ट यांनी लोकांना काहीही न कळू देता शहरवासीयांच्या भल्यासाठी खूप कामे केली. तेव्हा गेनहार्ट पुटपुटले की, हा माणूस लोकांना मूर्ख बनवत आहे. त्यानंतर गेनहार्ट यांनी निवडलेले संगीत वाजवण्यात आले तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.

theoddmentemporium