आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेहमान मलिक यांचा संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - दोन देशांचे नागरिकत्व असल्याचा आरोप असलेले रेहमान मलिक यांनी मंगळवारी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती रेहमान यांनी कराची विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना दिली.
रेहमान यांनी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारल्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. चार जूनला रेहमान यांना दुहेरी नागरिकत्व रद्द केल्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्यास रेहमान यांना अपयश आले होते.
रेहमान हे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार तसेच अंतर्गत सुरक्षामंत्री होते. दोन देशांचे नागरिकत्व असल्याच्या कारणावरून मलिक यांच्यासह नऊ खासदार आणि काही आमदारांना न्यायालयाने निलंबित केले होते.