लंडन- बीबीसी टीव्हीचा अँकर जिमी सॅव्हिलने हॉस्पीटलमधील रूग्णांबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याच्या बातम्या आल्या आहेत. ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, 28 हॉस्पीटलमध्ये 5 ते 75 वयापर्यंतच्या जवळ-जवळ 103 मुली आणि महिला त्याच्या शारीरिक वासनेच्या बळी ठरल्या. सॅव्हिल प्रेतांशी शारीरिक संबंध ठेवत आणि त्यांचे डोळे काढून आंगठीत घालत असे.
त्या नराधमाने हॉस्पीटलमध्ये 100 पेक्षा जास्त मुली आणि महिलांना आपल्या वासनेचे शिकार केले, असे चौकशी करणा-या अधिका-याने सांगितले. एका घटनेत तर आरोपी सॅव्हिल जेव्हा एका मुलीवर जबरदस्ती करत होता तेव्हा तिने स्वत:ला वाचवण्यासाठी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. जिमी ब्रिटनमधील हॉस्पीटलमध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम करायचा. या हॉस्पीटल आणि बीबीसीजवळ असलेल्या भागातील महिला त्याच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.
आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
एकेकाळी नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये असलेले आणि आता ब्रिटनचे आरोग्यमंत्री असलेले जेरेमी हंटने जिमी या आरोपीने महिलांवर केलेल्या अत्याचाराबद्दल पीडित महिलांकडे माफी मागितली. त्यावेळी पीडितांनी न्यायासाठी आवाज उठवला होता. पण त्याकडे तेव्हा दुर्लक्ष झाले होते. जिमी एक निर्दयी, संधीसाधू माणूस होता. तो एक धोकादायक शिकारीही होता. ज्याने 1960 पासून ते 2010 पर्यंत म्हणजे पाच दशकांदरम्यान अनेकांचा वासना भागवण्यासाठी वापर केला. यात बहुतेक रूग्ण आणि तरूण लोकांचा समावेश होता. जिमी मानसिक रूग्ण होता. त्याने देशाचा विश्वासघात केला, असे हंट यांनी सांगितले.
पुढे वाचा... सॅव्हिलबाबत आलेल्या रिपोर्टविषयी....