आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन: धुम्रपानाचे व्यसन सोडण्‍यास प्रवृत्त करणारे बोलके सिगारेट पाकीट तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - धूम्रपानाचे व्यसन सोडण्यास प्रवृत्त करणारे बोलके सिगारेट पाकीट शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. पाकिटातील ध्वनिमुद्रित संदेश ऐकल्यानंतर धूम्रपान करणा-या व्यक्तीच्या मनात व्यसन सोडण्याचा विचार येईल. स्टर्लिंग युनिव्हर्सिटीतील तंबाखू नियंत्रण संशोधन विभागातील शास्त्रज्ञांनी सिगारेटचा धोका सांगणा-या दोन वेगवेगळ्या ध्वनिमुद्रित संदेशांची पाकिटे तयार केली आहेत.


धूम्रपान सोडण्यासाठी एका पाकिटावर दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे, तर दुस-या पाकिटावर धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बर्थ डे कार्डमध्ये वाजणा-या धूनप्रमाणे हा संदेश असेल. पाकीट उघडताच ध्वनी आपोआप सुरू होईल. प्लेबॅक व ध्वनिमुद्रण युनिटला पाकीट जोडलेले असल्यामुळे ज्या-ज्या वेळी ते उघडले जाईल तेव्हा इशारा संदेश ऐकू येईल. आकर्षक पाकीट तयार करणा-या तंबाखू कंपन्यांपासून शास्त्रज्ञांना संदेशाची प्रेरणा मिळाली. या संशोधनाचा उपयोग झाल्यास धूम्रपान करणा-या व्यक्तींचे व्यसन सुटण्यास मदत मिळू शकेल.