आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - कर्करोगाचा प्रसार होण्यास कारणीभूत असलेल्या गुणसूत्रे शोधण्यात ब्रिटनमधील संशोधकांना यश आले आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कर्करोगाची कितपत शक्यता आहे किंवा नाही, यास जबाबदार असलेल्या 80 जनुकांना शोधण्यात आले आहे.
कर्करोगासंबंधीच्या या प्रकल्पात जगभरातील अनेक विद्यापीठातील संशोधक सहभागी झाले होते. केम्ब्रिज विद्यापीठ, लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च (आयसीआर) संस्थांचा त्यात पुढाकार आहे. गुणसूत्रांच्या हालचालींचा अभ्यास करून त्याद्वारे ब्रेस्टचा कर्करोग आणि त्याची रचना समजून घेण्यात येत आहे, असे प्रोफेसर डाऊग एस्टन यांनी सांगितले. धोकादायक गुणसूत्रे ओळखता आली असली तरी कर्करोगाच्या तिन्ही प्रकारातील गुणसूत्रांच्या धोक्याचा तपशील मात्र अद्याप अंधारात आहे. प्रत्येकाची कारणमीमांसा होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. सुमारे 60 टक्के धोका त्यामुळे संशोधकांच्या ज्ञान कक्षेच्या बाहेर आहे. त्यावरही अभ्यास करण्यात येणार आहे. संशोधना संदर्भातील प्रबंध ‘नेचर जेनेटिक्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
काय होणार फायदा?
विविध प्रकारच्या कर्करोगांमध्ये कोणता घटक कारणीभूत असतो, याचा शोध घेणे आणि त्यावर प्रभावी उपचारासाठी या शोधाचा उपयोग होणार आहे, असे डॉक्टर हरपाल कुमार यांनी सांगितले. ब्रिटनमधील कर्करोग संशोधन केंद्राचे ते प्रमुख संशोधक आहेत. वेलकम ट्रस्टच्या वतीने हे केंद्र चालवण्यात येते.
केंब्रिज विद्यापीठाची इमारत
1 हजार तज्ज्ञांनी कर्करोगाचा हा अभ्यास केला.
2 लाख लोकांच्या डीएनएची चाचणी.
धोका वाढला
गुणसूत्र पातळीवरील हालचालींचा धोका कर्करोगात अधिक असल्याचे संशोधकांना वाटते. त्यातही महिलांना तो अधिक असू शकतो. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ही भीती आहे. आतापर्यंत प्रत्येकी आठपैकी एक टक्का असे महिलांमधील धोक्याचे प्रमाण होते. ते दोनपैकी एक असे होऊ शकते.
‘हू’चा इशारा
कर्करोगामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याबाबत चिंता व्यक्त केली असून 2005 मध्ये 70 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2015 पर्यंत हे प्रमाण 90 लाख तर 2030 पर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाखांहून अधिक लोक मृत्यूच्या खाईत लोटले जातील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
मोठी उडी
गुणसूत्रांच्या कारणांचा वेध घेण्याच्या दिशेने हे संशोधन म्हणजे मोठी उडी म्हटली पाहिजे. प्रोस्टेट प्रकाराची कारणे अजूनही ज्ञान कक्षेत आलेली नाहीत. त्यावर आणखी यशस्वी संशोधन झाले तर कर्करोगामुळे होणारे असंख्य मृत्यू रोखता येऊ शकतील. रॉस एलेस, प्रोफेसर, आयसीआर, लंडन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.