आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन: एचआयव्हीची प्रभावी लस दृष्टिपथात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - शास्त्रज्ञांनी एचआयव्ही अँटिबॉडीपासून बचाव करणारी यंत्रणा आणि एचआयव्हीचे प्रमुख प्रोटीन्स स्थिर करण्याचे तंत्र शोधून काढली असून त्यामुळे एचआयव्हीच्या प्राणघातक जिवाणूवर प्रभावी लस निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे एचआयव्ही प्रोटीन्स स्थिर करण्याची रचनाच शोधून काढल्याने शक्तिशाली एचआयव्ही अँटिबॉडीज दबा धरून बसलेली ठिकाणे शोधण्यास मदत होणार आहे. एचआयव्हीच्या पृष्ठभागावर असंख्य छिद्रे असून प्रत्येक छिद्रामध्ये बल्बच्या आकाराची जीपे 120 नावाची तीन ओळखता येणारे प्रोटीन्स असतात. ते फुलाप्रमाणे पसरत जातात आणि बंद होतात. शास्त्रज्ञांनी एचआयव्हीच्या या प्रोटीन्सना स्थिर करण्याची प्रक्रियाच शोधली आहे.