आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Research News In Marathi, American Naval Research Labrotary

सूर्यमालेबाहेर पाण्याच्या वाफा, अमेरिकेच्या नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अतिउष्मा उत्सर्जित करणारा सूर्यमालेच्या बाहेरचा गुरू ग्रह ‘हॉट ज्युपिटर’ या वैज्ञानिक नावाने परिचित आहे. संशोधकांना या ग्रहाच्या कक्षेत पाण्याच्या वाफा दिसून आल्या. गुरू ग्रहापेक्षाही या हॉट ज्युपिटरचा आकार 6 पट भव्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीने (एनआरएल) अत्याधुनिक ड्रॉप्लर तंत्राचा वापर करून इन्फ्रारेडच्या साहाय्याने थेट ग्रहावरील पाण्याचे अस्तित्व सिद्ध केले.

‘ताऊ बो बी’ हा सूर्यमालेबाहेरील ग्रह त्याच्या नजीकच्या ताऊ बोटीस ता-याच्या भोवती परिक्रमा करतो. यालाच हॉट ज्युपिटर हे नाव देण्यात आले आहे. हा ग्रह एक परिक्रमा केवळ 3.3 दिवसांत पूर्ण क रतो. आपल्या सूर्यमालेत हा वेग आढळत नाही. सूर्यमालेबाहेर पाण्याचे अस्तित्व हा संशोधकांसाठी सातत्याने कुतूहलाचा विषय राहिला आहे.